Headlines

डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्या सेवेला एक वर्ष मुदतवाढ द्यावी…

मंगेश तळवणेकर यांची मागणी: आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या सेवेला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. ते म्हणाले,सन १९९६ पासून सिंधुदुर्ग…

Read Full News

तहसीलदार कार्यालय परिसराच्या सुशोभीकरणाला गती…

भाई देऊलकर यांच्या पाठपुराव्याला यश; तहसीलदार श्रीपाद पाटील यांचे अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे संस्थापक वासुदेव सहदेव उर्फ भाई देऊलकर यांच्या विनंती निवेदनानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तहसीलदार कार्यालय इमारतीची रंगरंगोटी सुरू करण्यात आली असून कार्यालयासमोरील संरक्षण भिंत उभारून तेथे आकर्षक गार्डन विकसित करण्यात येणार असल्याची…

Read Full News

कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

⚡दोडामार्ग ता.२६-:तालुक्यातील कुडासे-वानोशी नदी परिसरात आज सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेदांत सचिन सांगेलकर (वय १३) या अल्पवयीन मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा मूळ मुंबई येथील रहिवासी असून सध्या तो आपल्या आजीसोबत दोडामार्ग येथे राहत होता. उन्हाळी सुट्टी निमित्त…

Read Full News

पेंडूर घोडेमुख येथील युवकांच माणुसकीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने वरची मळेवाड मसुरकरवाडी येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती.यात विद्युत पुरवठा करणारा पोल ही कोसळला होता.यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ दोन्ही बाजूने अडकली होती.मात्र तात्पुरत्या स्वरूपात येथील स्थानिक ग्रामस्थांनी ही भली मोठी फांदी बाजूला करून वाहतूक…

Read Full News

वेंगुर्ला महिला पोलीस नंदिनी गावकर यांची कार्यतत्परता…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा केरवाडी येथे दोन दिवसापूर्वी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यात बोट उलटून शिरोडा येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते.तर दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. दरम्यान बेपत्ता यांचा मृतदेह मंगळवारी पहाटेचवायंगणी किनाऱ्यावर असल्याची माहिती मिळताचवेंगुर्ला पोलीस स्थानकातीलमहिला पोलीस नंदिनी गावकर, पो. कॉ.अरुण गुंजाळ, पो. कॉ.सागर चौगुले, ग्रामस्थ…

Read Full News

आडेली गावातील समस्याकडे जि. प., सा. बां. विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष…

आडेलीसाठी पुन्हा व्ही. जी. सावंत ‘ग्रामसेवक’ देण्याची अजय गडेकर यांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातीलआडेली खुटवळवाडी ते झाराप मार्गांनजिक असलेल्या समस्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.तसेच आडेली ते वजराट तिठा या एरियातील समस्याकडे सा. बां. विभागाचेही मोठे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी तातडीने लक्ष पुरवावे, अशी…

Read Full News

सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार…

⚡सावंतवाडी ता.२६-: देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले आणि १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.२६ वर्षे सैन्यदलात, तर…

Read Full News

मळेवाड येथे तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसवा…

पं स सदस्य धनश्री मराठे यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने गावातील काही वाड्यांमध्ये घरगुती उपकरणे, शेती पंप, व्यावसायिक उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्य करत नाहीत. ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा पंप ही कार्यान्वित होत नाहीत.यामुळे नळ धारकांना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायत ला अडचणी येतात.कमी दाबामुळे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी…

Read Full News

कणकवली येथील बांबू लागवड कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद…

कणकवली : संकल्प प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड या विषयावरील एक दिवसाची कार्यशाळा अतिशय उत्साहामध्ये पार पडली. ही कार्यशाळा २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळामध्ये कणकवली येथील भवानी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणास महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून मुंबई पुणे…

Read Full News

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक…

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब:वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण.. कणकवली : कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले असल्याने आज त्याठिकाणी नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी कुडाळ मालवणचे माजी…

Read Full News

You cannot copy content of this page