Headlines

शिवजयंती निमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे भरगच्च कार्यक्रम

⚡बांदा ता.०५-: शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, अक्षय मयेकर, प्रथमेश राणे, अनुप…

Read More

वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे शिवसेनेत
खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का

⚡कणकवली ता.०५-: खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना कनेडी शाखा येथे माजी केंद्रीय मंत्री ,शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.एकनाथ कोकाटे यांच्या समवेत शैलेश कोकाटे,…

Read More

भाजपचा “आनंद मेळावा” यशस्वी संपन्न

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ राणे, निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे यशस्वी नियोजन सिंधुदुर्ग दि.०४-: प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधत तसेच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेवून जत्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेला “आनंद मेळावा” यशस्वी झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात व्यक्त होत आहे….

Read More

‘थोडे द्या, खूप मदत करा ‘ रुजुल पाटणकर यांच्या या आवाहनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०४-: २६ जानेवारी २०२३- प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’ सावंतवाडी , बांदा व कुडाळ तसेच, ‘ वाव किड्स रायन प्री स्कूल ‘, सावंतवाडी , शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ यांनी ‘ माऊली कर्णबधिर, मतिमंद विद्यालय’ कोंडूरे व वेद पाठशाळा, सावंतवाडी येथे ‘ थोडे द्या, खूप मदत करा’ असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते….

Read More

केसरकर यांच्या फुगा सावंतवाडी विधानसभेची जनता फोडेल…

खासदार विनायक राऊत यांची केसरकरांवर जोरदार टीका… ⚡सावंतवाडी ता.०४-: दीपक केसरकर यांनी आधी शरद पवार यांच्याशी नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली आता ते कोटी कोटी ची आश्वासने देऊन सावंतवाडीतील मतदारांशीही बेइमानी केली आहे, जसा भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीचा फुगा अमेरिकेतील हिडनबर्ग च्या पाच जणांच्या टीमने फोडला तसा केसरकर यांचा फुगामतदार फोडतील असा इशारा शिवसेना…

Read More

देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भाजपचा प्रवास सुरू

जनतेने प्रवासाला साथ आणि सहयोग द्यावा;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आनंद मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून आवाहन ⚡मालवण ता.०४-: देशाला आत्मनिर्भर बनविणारा, महासत्ता बनविणारा, माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणारा पक्ष म्हणजे भाजप पक्ष आहे. भाजप देशाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी प्रवास करीत आहे. त्याला तुमचा आशीर्वाद आणि साथ द्या. आम्ही या प्रवासातील वारकरी आहोत. यापुढेही तुमचा पाठिंबा आणि…

Read More

उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी

एक लाख नोकऱ्या देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला केला खोटा विरोध;उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आनंद मेळाव्यात घणाघात ⚡मालवण ता.०४-: उद्धव ठाकरे शिवसेनेने कोकणचे केलेले नुकसान कोणाच्या लक्षात येणार नाही. अडिज वर्षाच्या सत्ता काळात ठाकरे सरकार नैसर्गिक नुकसानी झालेल्या नागरिकांना मदत करू शकले नाही. ठाकरे यांचे कोकणा वरील प्रेम बेगडी आहे. एक लाख रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला,…

Read More

जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी ताकद द्या

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे ⚡मालवण ता.०४-: २०१४ पूर्वी काही पक्ष म्हणायचे कोकणात भाजपचे काय आहे ? आजची उपस्थिती पाहिल्यावर लक्षात येईल, कोकणात भाजपाचे काय आहे , ते समजेल. कोकणातील युवक नोकरी निमित्त होणारे करणारे स्थलांतर थांबविण्याचे काम नागरिकांना करायचे आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रकल्प होऊ घातले आहेत. त्याला आपल्याला विरोध…

Read More

मागच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना पर्सनल त्रास देण्याचे काम केले

माजी खास निलेश राणे यांचा आनंद मेळाव्यात आरोप मालवण ता.०४-: नजर फिरवली तरी कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत। कोरोना नंतर एवढा मोठा मेळावा घेण्याचे धाडस फक्त भाजप करू शकते। साडे आठ वर्षे विकासात मालवण-कुडाळ मागे गेला आहे. आमदार आणि खासदार आपले नाहीत. हा बँक लॉक केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरून काढू शकतात. महाराष्ट्रात पहिल्यांदा विरोधकांना…

Read More

मुंबईत भाजपचाच महापौर असेल

आंगणेवाडी येथील आनंद मेळाव्यात मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा विश्वास मालवण ता.०४-:मुंबई नगर पालिकेत गेली अनेक वर्षे भ्रष्टाचार होत आहे. गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भूरटेगिरी केली. त्यांनी उंदीर मारण्यासाठी दोन प्रभागात एक कोटी रुपये खर्च केले. स्वतःला वाघ म्हणतात आणि उंदीर मारण्यात पैसे खातात, असा आरोप करीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार…

Read More
You cannot copy content of this page