राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.१२-: अर्चना घारे परब यांच्या रूपाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला नवीन कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे. महिला असूनही “त्या” समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचत आहेत. अत्यंत तळमळीने लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. महिला विश्वासाने त्यांच्याकडे आपली गार्हाणी घेऊन येत आहेत. विद्यार्थी, युवक त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणुन पाहत आहेत. आणि हेच मंत्री दीपक केसरकर यांचे मुख्य दुखणे आहे, असा पलटवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे.दरम्यान त्यांच्या जे पोटात होते ते वर्षभरानंतर आता ओठावर आले आहे.असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला.
