दोडामार्ग-भेडशी मार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येची दखल; निचऱ्याच्या कामांना सुरुवात
दोडामार्ग : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग-भेडशी मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या चेतना चित्रसेन गडेकर यांनी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला.नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यानंतर संबंधित रस्ता रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्याची माहिती मिळाली….
