⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ चे लोकार्पण आज शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी खा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार असून, तसेच आ. दिपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. ज्ञानेधर म्हात्रे, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,
शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर व न. प. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद च्या ‘नमो उद्यान’ चे लोकार्पण आज…
