नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे सामाजिक कार्याची दखल; लवकरच पुरस्कार होणार प्रदान
⚡सावंतवाडी, ता. ४-: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देणाऱ्या संजू परब यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार असून, पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
या पुरस्कारामुळे संजू परब यांच्या सामाजिक कार्याला विशेष अधोरेखित मिळाले असून, त्यांच्या समर्थकांकडून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
