बांदा/प्रतिनिधी
बांदा विकास सोसायटीसमोरील साईरा अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भला मोठा नाग शिरल्याने एकच खळबळ उडाली. गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी परिसरात ग्राहकांची मोठी वर्दळ असतानाच नाग आल्याने नागरिकांची व दुकानदारांची तारांबळ उडाली.
साईरा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर दुकानांची दाटीवाटी असून, याच परिसरात नाग शिरल्याचे निदर्शनास आले. नाग दिसताच नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र राजा खान यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत शिताफीने भल्या मोठ्या नागाला पकडले.
त्यानंतर नागाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. सर्पमित्र राजा खान यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून, ग्राहक व दुकानदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
फोटो:-
बांदा येथे पकडण्यात आलेला नाग. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
साईरा अपार्टमेंटमध्ये भला मोठा नाग; सर्पमित्राने शिताफीने पकडले
