Headlines

शिक्षक भारती, बॅ नाथ पै सेवांगण शिष्यवृत्ती स्पर्धेचा निकाल जाहीर..

ओरोस ता.१३-: शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत माध्यमिक विभागात कुडाळ हायस्कूलचीआर्या आगलावे याने प्रथम तर प्राथमिक विभागात भडगाव बुद्रुकचा रुद्र पिकुळकर याने प्रथम क्रमांक मिळविला.या परीक्षेत माध्यमिक विभागात इयत्ता…

Read More

जीवनात आहार नियंत्रण महत्त्वाचे…

डॉ दर्शना कोलते:ध्यास फाऊंडेशन आयोजित आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद. ओरोस ता.१३-: आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुर्धर आजारापासून आपला बचाव होवू शकेल. फक्त औषधावर अवलंबून न राहता आहार नियंत्रण सुद्धा महत्वाचे आहे. याच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य शिबीरे फार महत्वाची आहेत, असे प्रतिपादन डॉ दर्शना कोलते यांनी ध्यास फाऊंडेशन आयोजित आरोग्य…

Read More

गतवर्षी लोक अदालतीमध्ये ६३३० प्रकरणे तडजोडीने निकाली…

१४ कोटी ८९ लाखांवर वसुली:न्या अनिता कुरणे.. ⚡ओरोस ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2023 या कॅलेंडर वर्षामध्ये राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून 6 हजार 330 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या माध्यमातून 14 कोटी 89 लाख 77 हजार 67 रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या अनिता कुरणे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या…

Read More

यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयत सहावी राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीरित्या संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आणि इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भोसले शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली . यावेळी परिषदेचा विषय औषध निर्माण शास्त्र मधील वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता हा होता. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय औषध निर्माण शास्त्र व व्यवसायाबरोबर निगडित…

Read More

कोरजाई कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन…

⚡वेंगुर्ले ता.१३-: वेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई येथील कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याची लेखी तक्रार सहदेव अनंत माडये (रा. कोरजाई गाडेधाववाडी) यांनी तहसीलदार वेंगुर्ले यांच्याकडे दाखल केली आहे.सहदेव अनंत माडये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कर्ली खाडीत दररोज २५ ते ३० बोटी उत्खनन करत असून भालचंद्र राघो तारी हे शासनाच्या जागेत वाळू डंपरमध्ये भरतात. त्यामुळे उत्खनन केल्यामुळे…

Read More

भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई…

सावंतवाडी न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची वन कोठडी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: आज रोजी कुणकेरी वन सर्वे क्र. 81 मध्ये अपप्रवेश करून भेडल्यामाडाच्या झाडांची तोड करत पाने काढणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने कारवाई करत अटक केली. त्यांना आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.याचा सविस्तर वृतांत असा की,…

Read More

जेईई-मेन परीक्षेत कणकवलीच्या परेश मडवचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: आज जाहीर झालेल्या जेईई – मेन परीक्षा क्रमांक एकच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. सिंधुदुर्गातून कु. परेश सतीश मडव या विद्यार्थ्याने 96.50% पर्सेंटाइल गुण घेत, भारतातील टॉप चार टक्के विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकावला आहे.कुमार परेश हा कणकवली कॉलेजचा विद्यार्थी असून, जेईई-मेनच्या याच्यानंतर जेईई ॲडव्हान्ससाठी देखील कोकणातील अग्रगण्य अशी परफेक्ट अकॅडेमी…

Read More

नट वाचनालयात उद्या प्र श्री नेरूरकर जन्मदिन कार्यक्रम…

बांदा/प्रतिनिधीप्रसिध्द साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांचा ‘जन्मदिन’ कार्यक्रम बांदा येथील नट वाचनालयात बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात प्रतिथयश साहित्यिकाला “प्र.श्री. नेरूरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी केरी गोवा येथील साहित्यिक, लेखक भावार्थ मांद्रेकर यांना पुरस्कार देऊन…

Read More

भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थाकडून अथर्वशीर्ष पठण…

मालवण दि प्रतिनिधीमाघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मालवण मधील श्री माघी गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, आडारी गणेश मंदिर व रेवंडी येथील श्री भद्रकाली मंदिर येथे अथर्वशीर्ष पठण केले. मंत्रमुग्ध करणाऱ्या सुस्वरात विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण करत श्री गणरायाची भक्तिमय सेवा करतानाच उपस्थित भाविकांची मनेही जिंकली. भंडारी हायस्कुल…

Read More

एस. एम. प्रशालेची रेखाकला परीक्षेत चमकदार कामगिरी…

⚡कणकवली ता.१३-: -एस.एम.हायस्कूल, कणकवली या प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या रेखाकला अंतर्गत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यामध्ये एस.एम. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून प्रशालेची यशाची परंपरा कायम राखली आहे.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये तीन विद्यार्थी 1) पूर्वा संतोष सावंत 2) कु.अनुष्का अमोल केतकर 3)कु.किमया सतीश हिंदळेकर, द्वितीय…

Read More
You cannot copy content of this page