कोरजाई कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन…

⚡वेंगुर्ले ता.१३-: वेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई येथील कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याची लेखी तक्रार सहदेव अनंत माडये (रा. कोरजाई गाडेधाववाडी) यांनी तहसीलदार वेंगुर्ले यांच्याकडे दाखल केली आहे.
सहदेव अनंत माडये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कर्ली खाडीत दररोज २५ ते ३० बोटी उत्खनन करत असून भालचंद्र राघो तारी हे शासनाच्या जागेत वाळू डंपरमध्ये भरतात. त्यामुळे उत्खनन केल्यामुळे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सदरचा प्लॉट हा कांदळवन तोडून खारबंधाराच्या बाहेर अनधिकृत माती टाकून केलेला आहे. सदर रॅम्पमध्ये हा वाळूच्या परवाने मिळाले की वापरता जातो. पण मागील वर्षी प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे सदरच्या भागात परवाना मिळाला नाही. त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असे सहदेव अनंत माडये यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावर पुढील ३ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माडये यांनी दिला आहे.

कारवाई करण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी

You cannot copy content of this page