ओरोस ता.१३-:
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत माध्यमिक विभागात कुडाळ हायस्कूलची
आर्या आगलावे याने प्रथम तर प्राथमिक विभागात भडगाव बुद्रुकचा रुद्र पिकुळकर याने प्रथम क्रमांक मिळविला.
या परीक्षेत माध्यमिक विभागात इयत्ता ८वी मध्ये आर्या लक्ष्मण आगलावे प्रथम क्रमांक,
योगेश विवेकानंद जोशी कळसूलकर हायस्कूल सावंतवाडी द्वितीय क्रमांक, आर्या भार्गव फाले कळसूलकर हायस्कूल तृतीय क्रमांक आणि प्राथमिक विभाग इयत्ता ५ वी मध्ये रुद्र रामचंद्र पिकुळकर भडगाव बुद्रुक प्रथम क्रमांक, वेदा प्रविण राऊळ प्रा शाळा सावंतवाडी नं ४ द्वितीय क्रमांक, सोहन सुधीर गावडे प्रा शाळा सावंतवाडी
न २ तृतीय क्रमांक अशा प्रकारे विजेते ठरले.
