Headlines

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला सामाजिक उपक्रमांची रेलचेल…

⚡कणकवली ता.०९-: कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा नगराध्यक्ष झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस १४ जुलै २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी आणि विकास कामांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षवाटप, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या…

Read More

वाईट प्रवृत्ती विरोधात एकत्र येऊयात…

डॉ. मोहन दहीकर :कुडाळ मध्ये अंमली पदार्थ जनजागृती अभियान पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण,वेदांत महाजन आणि अथर्व तावडे आपापल्या गटातून विजेते.. ⚡कुडाळ ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे हे जरी खरे असले तरी वाईट मार्गावर जाणाऱ्याला योग्य मार्गावर आणता येते. त्यासाठीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सारखे कार्यक्रम पोलीस विभागाकडून घेतले जातात. या वाईट…

Read More

आडेली कामळेविर धरणातून१० जुलैला सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने होणार पाण्याचा विसर्ग

प्रशासनाचे आवाहन ; आडेली कामळेवीर झाराप नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेविर कार्यक्षेत्रात शासनातर्फे विस्तीर्ण धरण कार्यान्वित आहे. आडेली लघु पाटबंधारे प्रकल्प (ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग) येथील धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणुन धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. पाणीसाठ्यावर नियंत्रित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ९…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर..

सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना:मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक… ⚡सिंधुदुर्ग दि.०९-:मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यात पडझड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांचा आढावा घेतला. मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी सातारा, बारामती, सांगली अशा ठिकाणाहून कामगारांची…

Read More

*बाळकृष्ण पेडणेकर सावंतवाडी नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचा विजेता…

मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचं स्पर्धेत वर्चस्व! अठरा पारितोषिकांपैकी नऊ पारितोषिके पटकावली.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने विजेतेपद पटकावून चषकावर नाव कोरले. बाळकृष्णने स्पर्धेत निर्विवाद यश मिळवून जिल्ह्यातील अव्वल स्थान कायम राखलं. मुक्ताई ॲकेडमीच्या अठ्ठावीस विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ॲकेडमीच्या…

Read More

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर नव्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांना मंजुरी;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रसन्ना देसाईं यांच्या कडून आभार वेंगुर्लासावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जनसुविधेच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. या निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी त्यांचे आभार व्यक्त…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांकडून २५-३० हजारांची वसुली…?

स्थायी समितीत मनोज रावराणे यांचा गंभीर आरोप.. ⚡ओरोस ता ८-: सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात, असा गंभीर आरोप करीत मनोज रावराणे यांनी हे नियमात आहे का ? नियमात नसेल तर संबंधितांवर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न बुधवारी झालेल्या स्थायी समितीत उपस्थित केला. यावर अध्यक्ष…

Read More

पाणी शुद्धीकरणाचे प्रशिक्षणच नाही; जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी अनभिज्ञ

१,०५० नमुन्यांपैकी ९० दूषित; जलव्यवस्थापन समितीत संताप, तातडीने प्रशिक्षणाचे आदेश सिंधुदुर्गनगरी, ता. ८ :जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याच्या यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत उघड झाले. जिल्ह्यातील तब्बल ६० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि पाणी नमुने संकलित करण्याचे प्रशिक्षणच नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषद…

Read More

नव्या आयकर कायद्याविषयी उद्या कुडाळात मार्गदर्शन सत्र…

⚡कुडाळ ता.०८-: १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नव्या आयकर कायद्यात करण्यात आलेल्या व्यापक बदलांची माहिती करदात्यांपर्यंत पोहोचावी आणि आर्थिक नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय आयकर विभाग, दिल्ली तसेच प्रमुख आयकर आयुक्त, पुणे यांच्या सूचनेनुसार ‘ प्रारंभ 2026’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन ९ जूलै रोजी सकाळी ११.३० वा कुडाळ येथील हॉटेल लाईम…

Read More

कुडाळ न. पं. ची १४१ गुंठे जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी…

मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जागा मूळ मालक आणि कुळ यांच्या ताब्यात :नगरसेविका संध्या तेरसे यांचा थेट आरोप ; आमदारांकडे चौकशीची मागणी.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ नगरपंचायतीच्या जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी ठेवल्याचा आणि त्यामुळे कुडाळ नगर पंचायतचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांवर केला आहे. येथील भाजप कार्यालयात नगरसेविका संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदू…

Read More
You cannot copy content of this page