Headlines

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश…

कलाकारांसाठी साडेचार कोटींचे पॅकेज: दत्ता सामंत यांची माहिती.. ⚡मालवण ता.०९-:सिंधुदुर्गाची अस्मिता असलेल्या दशावतार, भजन आणि कीर्तन कलाकारांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे हे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. काल त्यांनी विधिमंडळात हा विषय लावून धरल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांसाठी वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच कलाकारांना ओळखपत्र…

Read More

*घारपी शाळेत EVM वर रंगला लोकशाहीचा उत्सव; चिमुकल्यांनी निवडले आपले शालेय मंत्रिमंडळ…

उद्याचे सजग मतदार घडविण्याचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली लोकशाहीची मतदान प्रक्रिया…* ⚡बांदा ता.०९-: लोकशाही ही केवळ शासनव्यवस्था नसून जबाबदारी, समानता, पारदर्शकता आणि योग्य नेतृत्वाची निवड करण्याची जीवनशैली आहे. ही लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात बालवयापासून दृढपणे रुजावीत, या उदात्त हेतूने सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक…

Read More

बांदा खेमराज 10 वी 91 च्या बॅचतर्फे आरोस दांडेली दिव्यांग शाळेस मदत…

⚡बांदा ता.०९-: बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या 1991 च्या दहावी बॅचच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वर्गाने आपल्या गेट टुगेदर कार्यक्रमांनतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेत भर टाकून 21 हजार रुपयांची देणगी आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर तथा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेस प्रदान केली.बांदा खेमराज प्रशालेच्या दहावीच्या 1990-91 वर्गातर्फे वेळोवेळी…

Read More

नाधवडे येथे २८ एकर शासकीय जागेवर एमआयडीसी स्थापन करण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी…

उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र:वैभववाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याचा विश्वास.. ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंत्री…

Read More

नादुरुस्त एसटी बसांची तातडीने दुरुस्ती करा…

बांदा–बोरिवली बस पुन्हा सुरू करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी: जावेद खतीब यांनी निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.०९-: सावंतवाडी आगारातून ग्रामीण भागात धावणाऱ्या नादुरुस्त एसटी बसेस तातडीने दुरुस्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध करावी, तसेच प्रवासी भारमान असूनही बंद करण्यात आलेली बांदा–बोरिवली एसटी बस पुन्हा सुरू करावी, या मागण्यांसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सहायक…

Read More

शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय निर्णय नको…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात संयुक्त लढ्याचा निर्धार: प्रांतअधिकाऱ्यांना ठाकरे शिवसेना व मनसेच निवेदन.. ⚡बांदा ता.०९-: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात हरकत नोंदविण्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती व पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याने या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांना…

Read More

संदीप बांदेकर यांच्या पाठपुराव्याने बांदा–निमजागा मार्गावरील धोकादायक लोखंडी जाळी हटवली…

⚡बांदा ता.०९-: बांदा येथील इंडियन गॅस एजन्सी शेजारील बांदेकरवाडी–निमजागवाडीकडे जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी बसविण्यात आलेली लोखंडी जाळी वाहनांच्या ये-जा दरम्यान मोठा आवाज निर्माण करत होती. त्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा मंडल सदस्य संदीप बांदेकर यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क…

Read More

साहित्याची साथ मिळाली, आता प्रतीक्षा विमा कवचाची…

‘सह्याद्री ऍडव्हेंचर’ची शासनाकडे आर्त हाक:खोल दऱ्या आणि काळोखे डोहही यांच्या धाडसापुढे टेकतात गुडघे.. ⚡कुडाळ ता.०९-: सह्याद्रीच्या खोल दऱ्या, डोंगर कपारे असोत कि नद्यांचे खोल डोह… कशाची तमा न बाळगता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करतात. रेस्क्यू करतात. कोणत्या घाटात अपघात झालेला असो कि नदीच्या खोल डोहात बुडालेल्यांचा शोध…

Read More

निराधार योजनांतील ऑनलाइन हयात दाखल्याची अट शिथिल करा…

अशोक दळवी गजानन नाटेकर यांची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी, ता.०९-: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी हयात दाखला ऑनलाइन सादर करण्याची सक्ती शिथिल करावी, अशी मागणी सावंतवाडी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष अशोक दळवी व गजानन नाटेकर यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय…

Read More

श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेने राबविला बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

बांधावरच शाळा भरवत विविध शेतीकामांचा घेतला अनुभव सावंतवाडी : ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नांगरणी, तरवा काढणी, भात लावणीसह विविध शेतीकामांचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव आणि कृषी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात…

Read More
You cannot copy content of this page