वैभववाडी प्रतिनिधी
चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी माननीय श्री. सुभाष चौगुले, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी आज पीएम श्री दत्त विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेस सदिच्छा व शैक्षणिक पाहणी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान शाळेला प्रशासकीय सुधारण्यासाठी आवश्यक ते निर्देश देणे, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा पोर्टल, पी एम श्री शाळा,PGI index, SD Goals,PAT, UDISE plus, डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, पी एम पोषण शक्ती निर्माण, महाजीआयएस इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला.
शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेच्या उल्लेखनीय बाबी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या अनुषंगाने वर्गनिहाय पाहणी करण्यात आली. शाळेने राबविलेला क्यूआर कोड आधारित उपक्रम हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. या उपक्रमातून शैक्षणिक साहित्य, विविध उपक्रम व आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देण्याच्या अभिनव संकल्पनेचे श्री. चौगुले साहेबांनी विशेष कौतुक केले.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा क्रमांक ३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पीएम श्री दत्त विद्यामंदिर, वैभववाडीच्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष अभिनंदन करण्यात आले. शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, स्वच्छता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
शाळा पाहणीनंतर झालेल्या संवादामध्ये श्री. चौगुले यांनी शाळेच्या उल्लेखनीय बाबींचे कौतुक करताना शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मिती यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रजापती थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तेजस साळुंखे, उपाध्यक्ष सौ गौतमी कळसुलकर, पत्रकार तथा शिक्षणतज्ज्ञ श्री. संजय शेळके,सौ.सुषमा दळवी, सौ समिधा शिंदे, श्री राजेश गजोबार पालकवर्ग तसेच केंद्रप्रमुख विजय केळकर रामचंद्र जाधव चेतन बोडेकर, गोसावी, पाटील ,यादव, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.दिनकर केळकर, शिक्षकवृंद सौ.रेखा धावले,सौ.अहिल्या लांडगे,श्री.अविनाश औटे उपस्थित होते.
फोटो पीएमश्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे शिक्षण उपसंचालक चौगुले सरांचे स्वागत करताना विद्यार्थी शिक्षक पालक
उपसंचालक चौगुले सर यांनी वर्गाला भेट देऊन विद्यार्थी पाहणी केली. छाया संजय शेळके वैभववाडी
