Headlines

बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा प्रारंभ…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा उपक्रम ; अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०६-: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पर्यावरणपूरक, कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे परिपूर्ण शिक्षण देत असताना प्रशालेचा गुणवत्तापूर्ण…

Read More

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकर चे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी कु. पद्मनाभ विद्याधर पाटणकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा तर सावंतवाडी तालुक्यातून ८ वा आला. कु. पद्मनाभ पाटणकर याला वर्गशिक्षक विजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल…

Read More

सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले…

परशुराम उपरकर:येणाऱ्या निवडणुकीत कोणीही राज्यकर्त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नये.. ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले आहे. सध्या झालेल्या शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार उमेदवार असतानाही सर्व शिक्षकांची पदे परजिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा पक्षाच्या उमेदवाराने डीएड, बीएड उमेदवारांना तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले होते. मात्र,…

Read More

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही…

नितेश राणें: काम दर्जेदार करा; अन्यथा गाठ माझ्याशी.. ⚡वैभववाडी ता.०५-: करूळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय. तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे. जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही, तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही. घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा…

Read More

युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप…

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०५-: राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म घरोघरी वाटण्याचा उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलमठ येथून सुरू…

Read More

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम…

बांधावरची शाळा भरवत शेतीच्या विविध कामांचा मुलांनी लुटला आनंद.. ⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी प्रभाकर खडपकर यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी…

Read More

विज चोरीप्रकरणी लोरे नं.१ मधील ग्राहकावर पोलिसात तक्रार दाखल…

⚡कणकवली ता.०५-: लोरे नं.१ मधील विश्राम आत्माराम राणे व त्यांची पत्नी सौ.वैशाली राणे यांची विज चोरीप्रकरणी कणकवली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंत बगडे यांनी कणवली पोलिसात तक्रार नोंदविली आहे. उपकार्यकारी अभियंता आपल्या फिर्यादित म्हणतात, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार लोरे नं.१ मधील विश्राम राणे यांच्या घरी विज मिटर तपासनीसाठी गेलो असता मिटर चेक…

Read More

वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त…

बांदा/प्रतिनिधीबांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात आज दुपारी झाला.सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक मोटार घेऊन बांद्यातून विलवडेच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली….

Read More

आडवली येथील चिरेखाणीचे साहित्य चोरीला…

सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीची यंत्र सामग्रीची चोरी.. ⚡मालवण ता.०५-: आडवली भटवाडी येथील दुर्गा प्रसाद गजानन तुळपुळे यांच्या चिरेखाणीवरील सुमारे २ लाख १६ हजार ५०० रुपयांची यंत्र सामग्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्याची घटना गुरुवारी ४ जुलै रोजी उघडकीस आली. याबाबत अज्ञाताविरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचरा पोलीस स्टेशनला दुर्गा प्रसाद तुळपुळे…

Read More

मालवण पॉलीटेकनिक विद्यार्थ्यांचे यश…

⚡मालवण ता.०५-: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल मधून गौरवी तेरसे (९९.३३ ℅) हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून युगा गावडे (८८.७९ ℅ ) हिने द्वितीय तर सांनिका वाईरकर (८०.०५…

Read More
You cannot copy content of this page