वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त…

बांदा/प्रतिनिधी
बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात आज दुपारी झाला.
सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक मोटार घेऊन बांद्यातून विलवडेच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली. झाडी असल्याने मोटार झाडीत अडकली. अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही. स्थानिकांनी धाव घेत मोटार बाहेर काढली. चालकाला किरकोळ दुखापत झाली.

You cannot copy content of this page