‘ड्रोन’च्या मदतीने बेपत्ता मच्छिमाराचा पोलीस प्रशासनाकडून शोध…

⚡मालवण ता.११-:तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमारांचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. दरम्यान, मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहिम घेतली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा शोध लागला नाही. दरम्यान, तीन दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड…

Read More

तरुण पिढीला सुसंस्कारीत बनवूया…

गोपुरी आश्रमातील परिसंवाद कार्यक्रमात मान्यवरांचा सूर.. ⚡कणकवली ता.११-: आधुनिक युगात तरुण पिढी सुशिक्षित होत आहे. मात्र, सुसंस्कारीत होताना दिसत नाही. या पिढीला सुसंस्कारीत करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात शाळांमधील साने गुरुजीच्या कथामालेला ब्रेक लागला आहे. कथामाला पुन्हा सुरु होण्यासाठी शिक्षकांसह सामाजिक चळवळीत…

Read More

मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांना पितृशोक…

⚡कणकवली ता.११-: कलमठ-सुतारवाडी येथील रहिवाशी तथा जिल्हा बँकेचे कर्मचारी चंद्रकांत उर्फ कांता बाळकृष्ण मेस्त्री (65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चंद्रकांत यांना मंगळवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. मेस्त्री यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आमदार नीेतेश राणे यांनी आपला दौरा अधर्वट…

Read More

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 12 विक्रेत्यांवर न. पं. दंडात्मक कारवाई…

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरात प्लास्टिक बंदी असतानाही काही विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. मंगळवारच्या आठवड्या बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 12 विकेत्यांवर नगरपंचायत प्रशासानाने कारवाई करत प्लास्टिक पिशव्या जप्त करत 26,000 रुपयांचे दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल अघम, विनोद सावंत, सतीश कांबळे ध्वजा उचले व…

Read More

लोकसभेच्या एका पराजयाने शिवसैनिक खचलेला नाही…

बाबी जोगी: वैभव नाईकांची मतदारसंघात जायंट किलर म्हणूनच ओळख… ⚡मालवण ता.११-: लोकसभेतील एका पराजयाने शिवसैनिक खचलले नाहीत तर नव्या उमेदीने येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या आमदार वैभव नाईक यांची ही ओळख शिवसैनिक, मतदार जनता निश्चितच ठेवेल आणि त्यांना मंत्रीही बनवतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदारांची काळजी करू नये अशी टीका उबाठा…

Read More

जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

अजित सांगेलकरांचा पुढाकार; सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.११-: येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आज जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे वह्या वाटप करण्यात आले. येथील युवा नेते अजित सांगेलकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबिवण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सचिन केसरकर, सचिन इंगळे ,सचिव संदीप इंगळे ,खजिनदार अमित सावंत, सचिव…

Read More

होडी उलटून खाडीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाऱ्याच्या कुटुंबीयांची वैभव नाईक यांनी घेतली भेट…

⚡मालवण ता.११-: तळाशील येथील खाडीपात्रात चार दिवसापूर्वी मच्छिमारी करीत असताना सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे होडी उलटल्याने खाडीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर या मच्छीमाराच्या कुटूंबियांची आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेत सांत्वन करीत धीर दिला तळाशील खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना मुसळधार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्यात मासेमारीची होडी…

Read More

असलदेतील वीज विषयक कामे मार्गी…

कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडित यांच्या पाठपुराव्याला यश ग्राहकांच्या समस्या सोडवितानाच मान्सूनची तयारी पूर्ण.. ⚡कणकवली ता.११-: तालुक्यातील महावितरणच्या नांदगाव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या गावांमध्ये वीज समस्या सोडविण्यासाठी विशेष कामगिरी बजावण्यात आली आहे. त्यामध्ये असलदे उगवतीवाडी ,दिवानसानेवाडी , नांदगाव मुख्य नळयोजना याठिकाणी 100 केव्हीएचे ट्रान्सफार्मर नव्याने बसविण्यात आले. उच्च व लघुूदाब असलेल्या वाहीनींवरील 30 गंजलेले पोल…

Read More

दोडामार्ग बाजारपेठेतील व्यवसायिक, फळ व फुल विक्रेत्यांना विशाल परब यांच्याकडून छत्र्यांचे वाटप…

⚡दोडामार्ग ता.११-: भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे दोडामार्ग बाजारपेठेतील व्यवसायिक, फळ व फुल विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी देवेंद्र शेटकर, सागर शिरसाठ, वैभव फाटक, अहिर संतोष, अक्रम खान, राजेश प्रसादी, सोनाली गवस, क्रांती जाधव, मृणाली माळवणकर, अंजना माळवणकर, संजय खडपकर, प्रकाश गवस, विनय गाडगिळ, रंगनाथ गवस,…

Read More

गोपुरी आश्रमाला अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार…

⚡कणकवली ता.११-: मुलुंड-मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानचा आस्मता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ हा पुरस्कार गोपुरी आश्रमास प्राप्त झाला. सदर सन्मान प्रतिष्ठानतर्फे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर व सचिव विनायक मेस्त्री यांच्याकडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश लब्दे यांनी सुपूर्द केला. 25 हजार रुपयांचा धनादेश असे…

Read More
You cannot copy content of this page