दिलीप गिरप:आयडियल चेस ॲकॅडमी तर्फे वेंगुर्ले येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन..
⚡वेंगुर्ले ता.११-: लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा हा धारगळकर सरांचा चांगला उपक्रम आहे. आपल्यातील खेळाला दिशा देण्यासाठी हेच वय महत्वाच असत. केवळ स्पर्धेसाठी खेळू नका. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते तसेच संयमही राखता येतो. एक दोन विजय मिळविले म्हणून जल्लेश करून हूरळून जाऊ नका. खेळावर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा, असे प्रतिपादन उत्तम खेळाडू तथा वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
आयडियल चेस ॲकॅडमी वेंगुर्ला तर्फे वेंगुर्ला तालुका मर्यादित १४ वर्षाखालील मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा रविवार ११ ऑगस्ट रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन श्री गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयोजक नागेश धारगळकर, युवासेना वेंगुर्ले शहर प्रमुख संतोष परब तसेच प्रदीपकुमार प्रभू, श्रीकृष्ण आडेलकर, सौरभ धारगळकर, ज्ञानेश्वर हरमलकर सर, उदय मालंडकर आदी मान्यवर आणि पालक उपस्थित होते.या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा स्वीसलींग पद्धतीने खेळविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभू सर यांनी तर सूत्रसंचालन व आभार नागेश धारगळकर सर यांनी मानले.
