Headlines

बांदा उड्डाणपुलाखाली वाहतूक नियोजन करा…

उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांची मागणी:राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदन सादर.. बांदा/प्रतिनिधीबांदा येथील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली पाटील व सहाय्यक अभियंता श्री….

Read More

कोट्यवधींचे बॅडमिंटन कोर्ट दोन वर्षांपासून बंद…

ईव्हीएम हटवून खेळाडूंसाठी खुले करा :युवासेनेची आक्रमक मागणी.. ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून वापराविना धूळ खात पडले असून, या कोर्टामध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तात्काळ अन्यत्र हलवून क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२९-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तिच्या या यशामुळे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक…

Read More

राजधानी एक्स्प्रेसचा सावंतवाडीत पहिला थांबा…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून उत्स्फूर्त स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी रेल्वे स्थानकास राजधानी एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्यानंतर आज प्रथमच ही रेल्वे स्थानकात आली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून राजधानी एक्स्प्रेसच जल्लोषी स्वागत करण्यात आले. ६ वर्षांनी काढून घेतलेला थांबा पुन्हा मिळाल्याने संघटनेने आनंदोत्सव साजरा केला आहे. सकाळी ९.३० वा. राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली….

Read More

फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे सावंतवाडीत गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावाने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२९-: फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र अंतर्गत चालविलेल्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये आज गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा महोत्सव जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे 29 जुलै 2026 रोजी सकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास मुनी, महर्षि पतंजली, आदि योगी भगवान शिव आणि परम पूज्य स्वामी रामदेव बाबांच्या प्रतिमेचे…

Read More

साईबाबांनी न मागता सर्वकाही दिले; आता प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर..

आमदार दीपक केसरकर:गुरुपौर्णिमेनिमित्त निवासस्थानी साई पादुकांचे पूजन.. सावंतवाडी : गुरुपौर्णिमेच्या निमीत्ताने सालाबादप्रमाणे प्रतिशिर्डी येथील श्री साई पालखी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आली.‌ यावेळी आम. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्याहस्ते साई पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री. केसरकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळो असं गाऱ्हाणं घातलं. यावेळी श्री‌. केसरकर म्हणाले, साईबाबांनी…

Read More

निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला दोन लॅपटॉप भेट…

⚡वैभववाडी ता.२८-: सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत वैभववाडी तहसीलदार कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला दोन लॅपटॉप भेट देण्यात आले. यामुळे विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.या लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके ग्रामपंचायत सदस्य…

Read More

करूळ नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आठ तासांच्या शोधानंतर सापडला…

⚡वैभववाडी ता.२८-: करूळ गावठाण अ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम वय 70 वर्षे यांचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ या ठिकाणी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तब्बल आठ तासाने सापडून आला. सकाळी नऊ वाजल्यापासून सह्याद्री जीव रक्षक टीमचे हेमंत पाटील, नरेंद्र कोलते, राजेंद्र वारंग, विजय सावंत,…

Read More

रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡बांदा ता.२८-:भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला जिल्हा मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, सरपंच प्रियांका…

Read More

महिला शेतकरी प्रमाणपत्र सरसकट देऊ नये…

शेतकरी शब्दाची स्पष्ट व्याख्या करावी:विलास सावंत.. ⚡बांदा ता.२८-: महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम-2026 चे स्वागत करतानाच महिला शेतकरी प्रमाणपत्र सरसकट सर्व महिलांना देऊ नये, अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केली आहे.श्री सावंत म्हणाले, स्वतःच्या कुटुंबासह शेतीत राबणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळणे…

Read More
You cannot copy content of this page