बँक ऑफ इंडिया सभागृहात भरले होते छायाचित्र प्रदर्शन..
कुडाळ : आपला भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला. फाळणीच्या वेळी काय काय घडले, याबाबत मांडण्यात आलेल्या दुर्मिळ छायाचित्राच्या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला .स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणींना यामुळे उजाळा मिळाला जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाच्या सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
भारत पाकिस्तान विभाजन विभूषिका स्मृती दिवस 14 ऑगस्ट असून 1947 पूर्वी भारत अखंड होता. 1947 ला स्वातंत्र झाला त्यावेळच्या फाळणीच्या वेळी काय काय घडले त्याचे छायाचित्र प्रदर्शन येथील जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया नजीकच्या सभागृहात मांडण्यात आले होते. जिल्हा अग्रणी बँक कार्यालय बँक ऑफ इंडिया सिंधुदूर्ग आयोजित मांडण्यात आलेले हे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत दोन ठिकाणी मांडण्यात आले होते.
शुभारंभ प्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक मुकेश मेश्राम, नाबार्डच्या अधिकारी दिपाली माळी आयसीआयसीआय बँकेच्या कुडाळ शाखाधिकारी विशाखा जोशी, बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखाधिकारी ऋषिकेश गावडे, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी तथा आर्थिक साक्षरता सल्लागार किरण पिंगूळकर, स्टार कृषी विकास केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक राजाराम परब, श्री राकेश, सचिन मसुरकर तुषार चव्हाण अमित जाधव आरसेटीचे संदेश कासले विद्यार्थी वर्ग तसेच इतर क्षेत्रातील व्यक्तींनी देशप्रेमींनी या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली . या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला
