कणकवली :- कणकवली बाजारपेठेतील पटवर्धन चौक येथील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील रहिवाशानी तब्बल २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित कणकवली नावाने रजिस्ट्रेशन करत सोसायटी स्थापन केली. १५ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी सोसायटीच्या नामफलकाचे अनावरण सोसायटीमधील ज्येष्ठ भाई भुकम यांच्या हस्ते करण्यात आल्.
कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांचे सोसायटीचे स्वप्नं साकार झाल्यामुळे सोसायटीच्या सर्व सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रुपेश आंबेरकर, सचिव राजेंद्र सावंत, खजिनदार उदय राणे ,संचालक सचिन तांबे, स्नेहा भोसले, स्वाती मोडक,मेघा शेट्टी, सुनील नाडकर्णी, दामोदर सावंत या संचालकांसह, संजय सावंत, पाढावे, आशिष पोयेकर,निम्हणकर बंधू उपस्थितीत होते.
कणकवली तालुक्यातील पटवर्धन चौक येथील जंक्शन पॉईंट असलेला लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील असलेल्या व्यापारी आणि रहिवासी ,काळेधारक यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता या ठिकाणी कचरा व्यवस्था, पाणी व्यवस्था ,संडास बाथरूम व्यवस्था ,सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल, व्यवस्था करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे सर्वानाच त्रास होत होता आज 23 वर्षानंतर या गाळे मालकांनीं स्वतःच्या हक्काची सोसायटी स्थापन करून या सगळ्या समस्यांचे निवारण करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे आज सगळ्यांच्या सहकार्यामुळे सोसायटीच्या माध्यमातूनउद्भवणारे प्रश्न सोडविले जातील असा विश्वास वाटतो. यावेळी एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा मंत्र रुपेश आंबेरकर यांनी आपल्या सभासदांना दिला.
