कुडाळ मध्ये प स. च्या वतीने हर घर तिरंगा रॅली…

देशाच्या जयजयकाराने कुडाळ दुमदुमले..

कुडाळ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अंतर्गत आज कुडाळ शहरात पंचायत समिती कुडाळच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.  भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणाने परिसर दणाणून गेला.


पंचायत समिती कुडाळ येथून हर घर तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली कुडाळ बस स्थानक ते परत पंचायत समिती अशी काढण्यात आली. या रॅलीत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर बालविकास प्रकल्प अधिकारी गीता चेदवणकर कृषी अधिकारी बालकृष्ण परब प्रमोद मुणगेकर संजय ओरोसकर रवी पवार महादेव तेली महादेव खरात दत्ताराम आंबेकर धनश्री परब पंचायत समिती विभागाचा बांधकाम, ल पा, शिक्षण, बालविकास, आदी विविध  विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच बॅरिस्टर नाथ पै  विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी  या रॅलीत सहभागी झाले होते १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने  ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान कुडाळ तालुक्यात हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे करण्यात आले आहे. यानिमित्त पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे केले जात आहे. कुडाळ पंचायत समिती प्रशासनाकडून तालुक्यात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट  रोजी या अभियानाला सुरूवात झाली. या अभियानात प्रमुख ९ थीम राबविण्यात येणार आहेत. यात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीज्, तिरंगा मॅरेथॉन,  तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज्, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा आदी कार्यक्रम घेण्यात आले  आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली.

You cannot copy content of this page