केसरकर यांनी नौटंकी बंद करावी; आमच्या शिवाय तुमचं काही चालणार नाही…

संजू परब: १५ वर्षात केसरकरांनी कायच केलं नाही..

⚡सावंतवाडी ता.१४-: दीपक केसरकर यांना मतदारसंघाचे काहीही सोयरसुतक नाही. ते जनता दरबाराला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले, तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील मुंबई येथील बैठकीत हजर राहण्यासाठी अट्टाहास केला असा आरोप माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.दरम्यान, गेली 15 वर्ष जो जनता दरबार झाला नाही तो पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेऊन 301 प्रकरणे निकाली काढली. दीपक केसरकर यांनी आपली नौटंकी बंद करावी, आमच्या शिवाय तुमचे काही चालणार नाही असा इशारा देखील यावेळी श्री परब यांनी दिला असून, येत्या काही दिवसातच सावंतवाडी मतदारसंघात जनता दरबार घेणार असल्याचे संजू परब यांनी यावेळी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की मंत्री केसरकर हे छोट्या मोठ्या समित्यावर आपणच अध्यक्ष राहणार असा हट्टा हाच तचा असतो लाडकी बहीण योजना चे विधानसभा मतदारसंघाचे समिती अध्यक्ष श्वेता कोरगावकर यांची नेमणूक झाली असताना हे नाव काढून त्याने स्वतः आपल्याला अध्यक्ष करा असे सांगितले यावरून केसरकर यांची कार्यपद्धती लक्षात येते अशी टीका माजी नगराध्यक्षांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केली.दरम्यान पंधरा वर्षात कधी जनता दरबार झाला नाही असा जनता दरबार पालकमंत्र्यांनी भरून सावंतवाडी मतदारसंघातील 308 प्रकरणे पैकी 301 प्रकरणे निकाली काढली त्यामुळे आता लवकरच येत्या सप्टेंबर अखेर सावंतवाडी मतदार संघात जनता दरबार होणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री परब म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबार भरवला आणि या जनता दरबारात 301 प्रकरणे मिटवण्यात आली 15 वर्षात केसरकर आमदार मंत्री असताना त्यांना प्रश्न सोडवता आले नाहीत उभा दांडा येथील रस्त्याचा प्रश्न पालकमंत्र्यांनी आज चुटकी सरशी सोडवला. असे ते म्हणाले. जनता दरबारामध्ये मंत्री केसरकर यांनी यायला हवे होते मात्र ते आले नाहीत उलट न येता त्यांनी मुद्दामहून चौकूळ गावच्या जमीन प्रश्न मुख्यमंत्र्यांची बैठक मुंबई बोलावले आणि आपण मुंबईत गेले या बैठकीला जिल्हाधिकारी यांनाही निमंत्रित केले यावरून त्यांची नौटंकी आता उघड होत आहे केसरकर यांनी नाटकीपणा थांबवावा असेही परब यांनी स्पष्ट केले.

चष्मा कारखाना मल्टिप्लेक्स हॉस्पिटल. हे गेली कुठे असा सवाल परब यांनी उपस्थित केला. फक्त चष्मा कारखाना सेटअप बॉक्स आणि मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल एवढ्या पुरतेच मर्यादित केसरकर आहेत काय असा सवाल परब यांनी केला.

You cannot copy content of this page