गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) :
मोपा गावचे सुपुत्र तथा स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक सदस्य, बांदेश्वर संगीत वर्ग बांदाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ गोमंतकीय संगीतकार दिगंबर उर्फ बाळु गाड (६३) यांचे बुधवार १४ ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईत खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी, भाऊ, वहिनी, विवाहीत बहिणी, पुतण्या असा मोठा परीवार आहे.

  दिगंबर गाड यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संगीताची साधना करुन संगीत कला खेडोपाडी रुजवली. मास्तर मनोहर जुईकर यांच्याकडून संगीत शिक्षणाचे प्राथमिक धडे घेउन गायन, वादन व हार्मोनियमची साधना सुरु केली. नंतर ज्येष्ठ संगीतकार शंकर गुरव यांच्याकडून त्यानी पुढील शिक्षण घेतले. अनेक शाळा व संगीत संस्थाच्या संगीत वर्गातून त्यानी  हजारो गायक तथा कलावंत तयार केले. शेकडो संगीत व सामाजिक नाटकांना त्यानी संगीत दिले. दिग्गज कीर्तनकारांना त्यानी संगीत साथ दिली. 

बांदा परिसरातील गावात त्यांनी शेकडो शिष्य घडविले. स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका तथा सुप्रसिद्ध गायिका सौ. विनया परब, संगीत शिक्षिका तथा गायिका योजना परब (मुंबई) व व्यवसायिक संध्या कुबल यांचे ते भाऊ, स्वामी विवेकानंद संस्थेचे खजिनदार प्रवीण गाड यांचे ते काका, उदयोन्मुख युवा गायक चैतन्य परब, व शांतादुर्गा देवस्थान वारखंडचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यांचे ते मामा, भजनी कलाकार अजित गाड व पत्रकार उमेश गाड यांचे भाऊ तर पत्रकार विराज परब यांचे ते मेहुणे होत. गुरुवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मोपा येथे स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

फोटो – दिगंबर गाड

You cannot copy content of this page