वायरी येथील केळबाई मंदिरात २० रोजी श्रावणी जत्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण वायरी येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात श्रावणी मंगळवार निमित्त दि. २० ऑगस्ट रोजी होणार श्रावणी जत्रोत्सव होणार असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता केळबाई रंगमंचावर सावंत दशावतारी नाट्य मंडळ नेरूर असरोंडी यांचा कनक दुर्गा हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांस व नाट्यप्रयोगास उपास्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page