सहदेव सावंत:भारत पाकिस्तान विभाजन विभूषिका स्मृती दिवस फोटो प्रदर्शनाचे आयोजन..
कुडाळ : सैनिकांमुळेच आपला भारत देश, येथील माणसे सुरक्षित आहेत भारत देशाचे सैन्य विश्वासास पात्र आहेत, त्यांचे देशप्रेम, देशासाठी अर्पित करण्याची त्यांची मानसिकता ही फार मोठी आहे असे प्रतिपादन सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक सहदेव सावंत यांनी भारत-पाक फाळणी स्मृती दिवसाच्या पूर्वसंध्येला 13 ऑगस्ट रोजी केले.
भारत पाकिस्तान विभाजन विभूषिका स्मृती दिवस 14 ऑगस्ट असून, 1947 पूर्वी भारत अखंड होता 1947 ला स्वातंत्र झाला त्यावेळच्या फाळणीच्या वेळी काय काय घडले त्याचे फोटो प्रदर्शन येथील बँक ऑफ इंडिया आरसेटी सभागृहाच्या दालनात मांडण्यात आले आहेत.एलडीएम ऑफिस बँक ऑफ इंडिया आयोजित आणि आरसेटी यांच्या सहकार्याने या ठिकाणी मांडण्यात आलेले दुर्मिळ प्रदर्शन हे 15 ऑगस्ट पर्यंत आहे यांचे उद्घाटन सेवानिवृत्त सुभेदार श्री सावंत व ज्येष्ठ नागरिक नरेश राणे आरसेटीचे संचालक किशोर रोडी बँक ऑफ इंडिया, सेवानिवृत्त अधिकारी आर्थिक साक्षरता सल्लागार किरण पिंगूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी संदेश कासले श्रेया मराठे, अमित, विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होता
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार श्री सावंत यांनी तीस वर्षे सेवा सैन्यात बजावली असून या सेवानिवृत्त कालावधीत त्यांनी जम्मू काश्मीर चीन बॉर्डर या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी आलेले अनुभव कथन करताना आज आपला देश सैनिकांमुळेच सुरक्षित आहे येथील माणसे सुरक्षित आहेत असे सांगत 35 वर्षांपूर्वीचा काळ त्यांनी विद्यार्थीसमोर मांडला. भारत-पाक विभाजन कशाप्रकारे झाले याचा थोडक्यात आढावा त्यांनी उपस्थिताना सांगितला आरसेटी संचालक रोडी यांनी भारतीय फौजांनी शत्रूंना नेस्तनाबूत केले सर्वात कमी कालावधीत ही झालेली लढाई होती आपली भारतीय सेना ही शिस्तबद्ध होती नियमाला अनुसरून चालणारी होती असे सांगत भविष्याकडे वाटचाल करताना आपण इतिहास वाचला पाहिजे इतिहास जो विसरतो तो स्वतःचे भविष्य घडवू शकत नाही असे सांगत देशाबद्दल आजच्या युवा पिढीने नितांत आदर ठेवत देशाभिमान जोपासला पाहिजे असे सांगितले प्रास्ताविकात श्री पिंगुळकर यांनी सरकारच्या आदेशानुसार 13,14,व 15 ऑगस्ट हे तीन दिवस हा विभाजन विभूषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे असे सांगत भारत-पाकिस्तान फाळणी स्मृती दिवस बाबतचा धावता आढावा घेतला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले या ठिकाणी मांडण्यात आलेले फोटोचे प्रदर्शन हे 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे
