नवीन मतदार नोंदणीसाठी बांद्यात 16 रोजी विशेष शिबिराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदार हरकती, बदल तसेच शासनाची लाडकी बहीण योजना अर्ज स्वीकारणे यासाठी शुक्रवार दिनांक १६ रोजी बांदा शहरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील नाव दुरुस्ती, बदल करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, तसेच इतर शासकीय योजनाची माहिती देण्यात येणार आहे.
शहरातील इतर प्रभागात देखील टप्प्याटप्प्याने ही शिबीरे घेण्यात येणार आहे. या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, प्रभाग क्रमांक चारचे ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, सौ. दीपलक्ष्मी सावंत-पटेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page