हर घर तिरंगा अंतर्गत पंचायत समिती देवगड येथे विविध उपक्रमाचे आयोजन…

⚡देवगड ता.१२-: हर घर तिरंगा अंतर्गत पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती हवालदार श्रीमती अरुणा लाड व श्री रमेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर,अधिक्षक मेघा राणे, विस्तार अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी अंकुश जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत सर्वत्र ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानुसार देवगड पंचायत समिती येथे १३ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहणाचा मान हवालदार श्रीमती अरुणा लाड व श्री रमेश चव्हाण यांना मिळाल्याने पं .स अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले . तर गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी ध्वजारोहणाचा मान आम्हा दोघांना दिला त्या बद्दल आम्ही भाराऊन गेलो असे मत हवालदार रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले .

You cannot copy content of this page