रुपेश राऊळांनी केलं जंगी स्वागत: विधानसभा निवडणुकी संदर्भात उद्या घेण्यात तिन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आढावा..
⚡सावंतवाडी ता.१२-: ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आ. मिलिंद नार्वेकर हे सिंधुदुर्गात दाखल झाले असून त्याचपूर्वीच त्यांच मोपा एअरपोर्टवर सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांचा जंगी स्वागत केले.शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत ते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका व विधानसभा उमेदवारा संदर्भात चर्चा करणार आहेत.
