⚡बांदा ता.१२-: बांदा येथील साईगणेश भजन मंडळाने अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरात श्री चरणी आपली भजनसेवा सादर केली.
यावेळी बुवा तात्या स्वार, अमित केळूस्कर, सूर्यकांत वराडकर, प्रवीण कळगुटकर, प्रमोद कळगुटकर, सोमा पिळणकर, तुषार देसाई, बाळू कंडारकर, शुभंकर वराडकर, पखवाज वादक मेहल कंडारकर, तबला वादक आत्माराम स्वार कुणाल आळवे यांच्यासह घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त स्वामी भक्त विजय गावकर, बिट्टू देसाई, मकरंद तोरस्कर, ज्ञानेश्वर सावंत, किरण सावंत, मिलिंद मोटे आदी उपस्थित होते.
गोवा आणि बांदा येथून मोठ्या संख्येने श्री स्वामी भक्त या भजन सेवेचा आस्वाद घेण्यासाठी यावेळी उपस्थित होते. बांदा येथील मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक अनिल पावसकर यांनी भजनी मंडळाला बांदा ते अक्कलकोट अशी विनामूल्य प्रवास सेवा दिली.
बुवा तात्या स्वार म्हणाले कि, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात भजन सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. हे आमच्यासाठी भाग्यकारक असून भविष्यात संधी मिळाल्यास श्री चरणी सेवा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील.
साईगणेश भजन मंडळ बांदा यांची अक्कलकोट येथे स्वामी चरणी भजन सेवा अर्पण…
