मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शची सभा मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेमध्ये प्रामुख्याने मालवण शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच संघटना वाढीसाठी विविध उपक्रम राबवून संघटनेचे काम अधिक व्यापक पध्दतीने करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव अर्जुन परब, महिला संघटक सौ.मिलन पार्टे त्याचप्रमाणे मालवण तालुका सल्लागार भालचंद्र राऊत, कार्याध्यक्ष श्री. प्रभू खानोलकर, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, मालवण तालुका महिला संघटक मुक्ता रजपूत, मालवण तालुका निरीक्षक संदेश पाठक, सचिव राजेशकुमार लब्दे, सहसचिव महेश मयेकर, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:-
मालवण तालुका ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा करतांना तालुकाध्यक्ष सुधीर धुरी व इतर
