मालवण दि प्रतिनिधी
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शिक्षण विभाग (माध्यमिक) सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला तर अखिल भारतीय मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेत याच हायस्कूलची कुमारी दिया गोलतकर हिने तॄतीय क्रमांक मिळवला
तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा तालुका स्कूल मालवण येथे झाला यात भंडारी ए सो हायस्कुलची दिया गोलतकर हिने कॄत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आह्वाने याविषयावर तॄतीय क्रमांक मिळवला
तर भंडारी ए सो हायस्कूलने अखिल भारतीय मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञानावर आधारित असणाऱ्या या नाटिकेमध्ये अथर्व दळवी, आर्यन वेंगुर्लेकर , पारस मेस्त्री, पार्थ आंबेरकर, साईश चह्वाण, वेदांत बिरमोळे, धीरज जुवाटकर, कॄष्णा मांजरेकर, यश वाघ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विज्ञान नाट्योत्सवाचे परीक्षण मालवणचे रंगकर्मी श्री संजय शिंदे, आणि अभिनेत्री सौ शुभदा टिकम यांनी केले होते
या दोन्ही स्पर्धेतील विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे तसेच ग्रंथपाल श्री. प्रफुल्ल देसाई यानी मार्गदर्शन केले
दोन्ही स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, औनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर, चेअरमन श्री.सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वामन खोत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एच बी तिवले, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
