टोपीवाला हायस्कुलमध्ये कथक प्रशिक्षण वर्ग सुरु होणार…

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूलच्या ज्ञानमंदिरमधील अनंत संगीत शाला या दालनात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा कथक परीक्षा सर्टिफिकेट कोर्स प्रशिक्षण वर्ग दि. १० ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे. याबाबत कलाशिक्षक बी.जी.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक अनुजा गांधी यांच्या उपस्थितीत पालक सभा घेऊन माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बी.जी.सामंत यांनी जीवनातील कलेचे महत्त्व व नियमितता सांगितली. अनुजा गांधी यांनी प्रशिक्षण वर्ग महत्व, रूपरेषा सांगितले. तसेच कथ्थक शास्त्र म्हणजे नेमके काय याचे प्रात्यक्षिक अनुजा गांधी आणि सोनाली गावडे यांनी दाखवले. या वर्गाची नियमावली व सविस्तर माहिती सौ. ज्योती तोरसकर यांनी दिली. दि. १० ऑगस्ट पासून दर शनिवारी सकाळी ११. ३० ते १२. ३० या वेळेत नियमित वर्ग चालवण्याचे ठरविण्यात आले.

You cannot copy content of this page