मार्च 1993 च्या माजी विद्यार्थी बॅच कडून देवबाग हायस्कूल ला शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत…

⚡मालवण ता.०९-: अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग म्हणजेच जुनी न्यू इंग्लिश स्कूल (1973) देवबागच्या मार्च 1993 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच कडून प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी रुपये वीस हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. सदरची आर्थिक मदत ही संस्था सदस्य श्री. निलेश सामंत आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना रुपेश खोबरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी मार्च 1993 च्या इयत्ता दहावी माजी विद्यार्थी बॅच मधील श्री. प्रवीण घाटवळ, श्री. महेंद्र गोवेकर, श्री.राजन मोरजकर, सौ. साधना केळुसकर (वाईरकर), सौ. सरीता मांजरेकर (धोपावकर ) हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी संस्था सदस्य श्री.कृष्णा मालंडकर व श्रीमती तारी या उपस्थित होत्या, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर देखील उपस्थित होते.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.खोबरेकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचे आभार मानले व सदरची मदत ही शैक्षणिक उपक्रमात खर्च होईल याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच इयत्ता १० वी मार्च 1993 च्या बॅच कडून प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांना व संस्था सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन व अल्पोपहाराने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे लिपिक श्री. रुपेश खोबरेकर यांनी केले.

You cannot copy content of this page