जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे नंबर १ चा बांधावरची शाळा स्तुत्य उपक्रम…

मालवण दि प्रतिनिधी
शाळेतील मुलांना शेतीविषयक माहिती मिळावी,श्रम करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी केंद्रशाळा मसुरे नं.१ ची मुले आणि शिक्षक यांनी पालकांसमवेत बांधावरची शाळा हा उपक्रम मसुरे येथे राबविला.

महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक दृष्ट्या शेतकरी आणि शेतकऱ्यांचे जीवन, शेतीची अवजारे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. श्री.दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं.१ या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक वृंदाने अनुभवला. बांधावरच्या शाळेतील एक दिवस या उपक्रमांतर्गत शेतीची लागवड कशी करावी, तरवा काढणी-लावणी, शेती अवजारांबद्दल माहिती, शेती विषयक असणाऱ्या अनेक गोष्टींची चर्चा प्रत्यक्ष बांधावर जाऊन विद्यार्थ्यांनी शेतमालकाशी केली. पारंपारिक शेतीतील अनेक अवजारे, आधुनिक शेतीची नवीन पद्धत, अवजारे याबाबत अनेक शंका विचारल्या गेल्या.

यावेळी शा.व्य.स.अध्यक्ष सौ.शितल मसुरकर,उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, श्री.सन्मेष मसुरेकर, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख, शेतमालक सौ.सविता दिलीप मोरे तसेच प्रशाला उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत ,शिक्षक गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर,सुजाता वेडेकर,हेमलता दुखंडे आदिजण उपस्थित होते. दिवसभर या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शेती विषयीचा अनुभव घेत माहिती घेतली.

You cannot copy content of this page