छप्पर पत्रे उडून लाखोंनी रूपयांचे नुकसान;मुसळधार पावसासह जोरदार वादळ
*💫सावंतवाडी दि.०६-:* आज झालेल्या या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने केसरी धनगर वाडी येथील घरांना मोठा तडाखा बसला. अनेक रांची छपरे व पत्रे उडून गेल्याची घटना घडली. याबाबतची माहिती माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांनी दिली. आज झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केसरी गावातील अनेक घरांना याचा तडाका बसला. अनेक घरांची कवलेउडून गेली, केसरी धनगर वाडीतील संतोष जंगले ,न्हानू पाटील ,जनार्दन गोरे, गुरुनाथ जंगले ,,भरत गोरे ,धोंडी लांबर, विजय जंगले, यांच्या घरांना या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना याची कल्पना देण्यात आली असून स्थानिक तलाठ्यांना घटनेचे पंचनामे करण्यास सांगितले आहे.
