वैभववाडी प्रतिनिधी
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे -सडुरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, पोलिस ठाणे वैभववाडी , राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीर आज आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे संपन्न झाले. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमा पूजनाने त्यांना अभिवादन करुन रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला.
पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील ३८ रक्तदात्यांनी या भव्य रक्तदान शिबीरात आपले रक्तदान करत या शिबिरात सहभाग नोंदविला सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व आयोजकांच्या वतीने मेजर कौस्तुभ राणे यांचे वडील प्रकाश कुमार राणे, काका विजय रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष सज्जन काका रावराणे, सचिव प्रमोद रावराणे, प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, जिवनधारा रक्तपेढी कोल्हापूर चे जयनीश मोरे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे राजेश पडवळ, व्यापारी मंडळाचे तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, रोटरी क्लब वैभववाडीचे प्रशांत गुळेकर, भाजपाचे पदाधिकारी राजू राणे, जि.प.सदस्य सुधिर नकाशे,डॉ.एम.ए.चौगले, डॉ.एस.सी.राडे, आर,ए.भोसले तसेच आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी तसेच रक्तदाते उपस्थित होते.
