उभादांडा विद्यालयाला रस्ता मोकळा करून देण्याची युवराज लखमराजेची ग्वाही…

संजू परब व लखम राजे यांनी घटनास्थळाची केली पाहणी, विद्यालयाच्या प्रश्नासाठी त्रयस्त व्यक्तिकडे जाण्याची गरज नाही.

⚡वेंगुर्ला ता.०८-: न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा विद्यालयाला शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शिक्षक व विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडीअडचणींची माहिती श्री.संजू परब व जमिनीचे मालक श्री.लखमराजे भोसले यांनी शाळेच्या ठिकाणी भेट घेत माहिती घेतली.दरम्यान श्री लखमराजे भोसले यांनी किमान दहा फूटांचा रस्ता विद्यालयासाठी लवकरात लवकर मोकळा करून देणार अशी ग्वाही यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापकांना दिली.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार मा.श्री. निलेश राणे यांच्या दि.3 ऑगस्ट 2024 च्या सावंतवाडी भेटी दरम्यान श्री.तुषार साळगांवकर,श्री.हितेश धुरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा,वेंगुर्ले या विद्यालयाच्या मुलांना जाणायेण्यासाठी त्रास होणाऱ्या रस्त्या संदर्भात भेट घेऊन लक्ष वेधले होते. याबाबत त्वरीतच श्री. निलेश राणे यांनी आपले सहकारी श्री.संजू परब यांना जमिनीचे मालक श्री.लखमराजे भोसले यांच्या सोबत शाळेच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष भेट देणाची सूचना केल्याने त्यांनी जाऊन पाहणी करत याबाबत शाळा संस्था आणि संबंधित कुटुंबीय यांच्या दोन्ही वकिलांकडून माहिती घेऊन, प्रशासकीय अधिकारी म्हणजेच प्रांत यांची लवकरच भेट घेऊन कायदेशीर पणे विद्यालयाला रस्ता उपलब्ध करून देणार असे आश्वासन सुद्धा दिले.

तसेच शाळेच्या इमारतीला त्रासदायक ठरणारे झाड 4 दिवसात तोडून देण्याचे सुद्धा आश्वासन दिले.त्याच प्रमाणे विद्यालयच्या रस्त्या संदर्भात जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मालक म्हणून आपण पूर्णतः सक्षम असल्यामुळे सदर प्रश्ना साठी आपल्याला कोणत्याही राजकारणी किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे मध्यस्थी साठी जायची गरज नाही असे सांगितले.

याप्रसंगी माननीय श्री संजू परब यांनी श्री लखमराजे भोसले यांनी शाळा संस्था, माजी विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थी यांना दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल समस्त ग्रामस्थाच्या वतीने आभार मानले.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा संस्था पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page