राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा कोकण दौरा करणार…

⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आणि भारतीय जनता पार्टीचे सेवा प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक श्री. शेखर मुंदडा यांची सेवा प्रकोष्ठ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा संयोजक श्री. भालचंद्र राऊत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोसेवा गतीविधीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक श्री. चंद्रशेखर पुनाळेकर यांनी पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंदडा यांनी आपण लवकरच कोकण दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी कोकण विभागातील स्वयंसेवी संस्थाच्या मार्गदर्शनासाठी तसेच सबलीकरण आणि देशी गोवंश संरक्षण अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील एका देशी गोशाळेसाठी रु.२५ लाख अनुदान, तसेच गोवंश आणि पर्यावरण वाचविण्यासाठी दहनासाठी होणारी वृक्षतोड थांबवावी यासाठी दहन विधीसाठी गोकाष्ठचा वापर करण्यात यावा असा अध्यादेश काढून तशा सुचना संबधित जिल्हाधिकारी यांना दिल्याचे श्री शेखर मुंदडा यांनी सांगत त्यामुळे पर्यावरण वाचेल आणि गाय जगेल असेही ते म्हणाले.

गोसंगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा , गोरक्षक, गोपालक, गो आधारित शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या १०जी धोरणावर आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी लवकरच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा श्री शेखर मुंदडा साहेब दौरा करणार आहेत. या दौऱ्यात या तिन्ही जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, गोशाळा आणि गोपालक याच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page