आंबोलीत विजेच्या गडगडाटासह पाऊस वीज खंडित..

वीज खंडित

*💫आंबोली दि.०६ विष्णू चव्हाण -:* आंबोलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे विज पुरवठा देखील खंडित झाला आहे. गेले दोन दिवस आंबोलीत अतिउष्णतेची लाट पसरली होती. आज तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु ऊस शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

You cannot copy content of this page