सावंतवाडी ता.०३-:
सावंतवाडी येथील न्यायालयातून पळून गेलेल्या बांगलादेशी आरोपीला इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आज सायंकाळी पकडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सावंतवाडी पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयात आज दुपारी हजर करण्यासाठी नेलेल्या बांगलादेशी आरोपीने लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगत तेथून पालायन केले. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
सायंकाळी उशिरा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण, मयुरेश कमतनुरे, संजय हुंबे, नरेश कुडतरकर यांना संशयित महामार्गवरून लपतछपत येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच त्याचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतले. बांदा पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पुन्हा सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे
त्या बांगलादेश आरोपीला इन्सुलीत पकडले…
