बांदा/प्रतिनिधी
मुसऴधार पावसामुळे गुरुवारी पहाटे बांद्यात तेरेखोल नदीचे पाणी वाढले होते.हे पाणी नदीपात्राबाहेर येऊन नदीनजीकच्या आळावाडा मासळीमार्केटपुढे आल्याने मच्छामार्केट,शेर्ले मार्ग बंद होता. सखल भागात आळवाडा मच्छी मार्केट मध्ये असल्याने दुपारीपर्यंत तेरेखोल नदीचे पाणी होते. गुरुवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी नदीत गेले.
सायंकाळी बांदा आळावाडा मासळीमार्केटही नेहमीप्रमाणे सुरु होते. बांदा आळवाडा तेथे पूराच्या पाण्यात कार फसल्याने चालकाच्या अंगाशी आले. मच्छी मार्केट (मच्छीमार्केट) हा परिसर सखल भागात असल्याने नेहमीच तेरेखोलचे पाणी घुसते. आज गरुवारी सकाळी एका कारचालकाने शेर्लेत जाण्यासाठी पाण्यातून प्रवास करताना अतिहुशारी चालकाच्या अंगाशी आली. या पुराच्या पाण्यातून कार नेत असताना कार पाण्यात फसली. बांद्यातील युवकांनी समयसूचकता दाखवल्याने कारचालकाचा जीव वाचला.
