पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या समन्वय समितीमध्ये मंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती…

सावंतवाडी : राज्यातील पोलीसांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींबाबत शासनाकडे निवेदने केली जातात. पोलीसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या, अडचणींवर विचारविनिमय करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी उपमुख्य तथा गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस तर सदस्यपदी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा, आ. कालिदास कोळंबकर, आ.राम कदम,आ. परिणय फुके, आ‌.सिद्धार्थ शिरोळे, अपर मुख्य सचिव, गृह, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, उपाध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या., मुंबई, राहुल दुबाले आदींचा समावेश करण्यात आला आहे. ही समन्वय समिती पोलीसांच्या कुटुंबियांच्या अडचणींसंदर्भात कौशल्य कार्यक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, निवासस्थाने, आरोग्य इत्यादी समस्यांबाबत विचारविनिमय करुन त्याचे निराकरण करण्यासाठी शासनास उपाययोजना सुचवणार आहे‌

You cannot copy content of this page