मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाण वाडी येथील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या श्री. रावजी चव्हाण यांना उपचारांसाठी आभाळमाया ग्रुपतर्फे आर्थिक मदत जमा करून ती चव्हाण यांना सुपूर्द करण्यात आली.
रावजी चव्हाण हे मिरज येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून मिरज येथे जाऊन त्यांना हि मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आभाळमाया ग्रुपचे सदस्य समीर रावले, जगदीश परब, महेश परब, श्रीकांत शिरसाट आदी उपस्थित होते. रावजी चव्हाण यांना समाजातील जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी मदत करावी, यासाठी Reshma Ravji Chavan, State Bank of India, Branch : Katta, A/C No.- 32586737652, IFSC code : SBIN0012213, Google pay : 9423273278 या द्वारे मदत करावी, असे आवाहन आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी केले आहे.
