सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत अपुरे समस्या दूर करा…

संजय गवस: शिवसेनेच्या माध्यमातून वेधले बांधकाम विभागाचे लक्ष..

⚡दोडामार्ग ता.३०-: तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होणारे अपुरे रस्ते, गटारे, रस्ता लगत धोकादायक असलेली झाडे यांमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या दुर करण्यात याव्यात यासाठी तालुका प्रमुख संजय गवस, शिवसेना उबाठा च्या वतीने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा भडीमार केल्या.. तसेच दोडामार्ग ते बिजघर महामार्ग वर धोकादायक असलेली झाडे तोडण्यात यावी तसेच दोडामार्ग शहर.. भेडशी मार्गावर, तेथील गटारे मुळे पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते.. ती गटारे खुली करण्यात यावी.. तसेच भेडशी पूल नजिक योग्य उपाययोजना करण्यात यावी.. तालुक्यात इतर मार्गातील धोकादायक झाडे तोडण्यात यावी.. याबाबत कार्यकारी अभियंता किणी याबाबत येत्या आठ दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.. तशा सूचना शाखा अभियंता घंटे यांना देण्यात आल्या… यावेळी नगरसेवक चंदन गावकर, तालुका संघटक लक्षमण आयनोडकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक विनिता घाडी युवा सेना तालुकाधिकारी मदन राणे, विजय जाधव, विभाग प्रमुख संतोष मोर्य,भिवा गवस, सचिन केसरकर, सुनिल गवस, नयनी शेटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

You cannot copy content of this page