आदेशानंतरही ऑफलाइन धान्य देण्यास टाळाटाळ…

संजू परब यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधल्यावर धान्य देण्यास करण्यात आली सुरुवात:नागरिकांनी संजू परब यांचे व्यक्त केले आभार..

⚡सावंतवाडी ता.३१-: ई पॉस मशीनचा सर्वर डाऊन असल्यामुळे राज्यात ऑफलाईन धान्य वितरण करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरी देखील आज खासकीलवाडा येथील रेशन धान्य दुकानांवर धान्य देण्यास नागरिकांना टाळाटाळ करत होते. याबाबत काही नागरिकांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे लक्ष वेधले असतात त्यांनी वरिष्ठांना कळवून तात्काळ ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करण्यास आदेश दिले. त्यामुळे नागरिकांनी श्री परब यांचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती अशी की प्रणालीत अडचणी असल्यामुळे गेले काही दिवस अनेक कुटुंबे धान्य वितरण पासून वंचित राहिली होती. याबाबतची मागणी केल्यानंतर फक्त या महिन्यासाठी ऑफलाइन धान्य देण्याची मुभा देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page