सिंधुदुर्गनगरी दि.०५ शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. कलम 144 आमि रात्र संचारबंदी लागू करणे – सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा जमा होण्यास प्रतिबंध असेल. हा कालावधी वगळता उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळई 7.00 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 8.00 पर्यंत सार्वजनिक ठिकामी कोणत्याही नागरिकास वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा पुझील कारणास्तव दिलेल्या परवानगीशिवाय फिरता, वावरता (संचारबंदी ) येणार नाही. वैद्यकीय तसेच इतर अत्यावश्यक सेवा यामधून वगळण्यात येत आहेत. यासाठी होणाऱ्या हलचाली किंवा संचार ह्या प्रतिबंधीत असणार नाहीत. अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल. रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनीक्स, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषध निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जसे की रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक तसेच विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व सेवा, स्थानिक प्राधिकरण याद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालांची, वस्तूंची वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, ई कॉमर्स, मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा. बाहेरील सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया – सर्व समुद्रकिनारे, उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यंत आणि शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळे मध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी covid-19 बाबत केलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी बारकाईने निरीक्षण केले जात आहे, याची खात्री करावी आणि अशा ठिकाणी गर्दी निदर्शनास आल्यास किंवा अभ्यागतां कडून covid-19 नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे covid-19 विषाणू संसर्गाचा धोका निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासनाकडून ही सार्वजनिक ठिकाणी तात्काळ बंद केली जातील दुकाने बाजारपेठा आणि मॉल्स – अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठा मॉल्स पूर्ण दिवस बंद राहतील, अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने ही त्यांच्या परिसरामध्ये ग्राहकांच्यामध्ये योग्य सामाजिक अंतर राखून सुरू राहतील, ज्यादा ग्राहक असतील त्या ठिकाणी चिन्हांकीत करून ग्राहकांना प्रतिक्षा कक्षात ज्या ठिकाणी पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल अशा ठिकाणी बसवले जाईल, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे, सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेमेंट इत्यादीचे पालन करण्यात यावे, या आदेशाने बंद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे, तसेच दुकान मालकाने दुकानांमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपयांचे जसे की पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेमेंट पूर्वतयारी करण्यात यावी जेणेकरून शासना कडून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता सदर दुकाने सुरू करण्यावर तात्काळ निर्णय घेणे सोयीस्कर होईल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुढील निर्बंधाचे पालन करत पूर्ण क्षमतेने सुरू राहील, ऑटो रिक्षामध्ये चालक आणि फक्त दोन प्रवासी, टॅक्सी, चार चाकी वाहन, चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के (आरटीओ विभागाकडील नियमानुसार), बस – आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील तितके प्रवासी, कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी असणार नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पद्धतीने मास्क
*_कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन आदेश जारी…
