उरण येथील हत्याकांडाचा मालवणात काँग्रेसकडून निषेध व्यक्त…

⚡मालवण ता.३०-: उरण येथील यशश्री शिंदे या युवतीच्या क्रूर हत्याकांडाचा आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मालवण भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून यशश्री शिंदे हिला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडित शिंदे कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळावे तसेच या हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार ताजर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, वायरी भूतनाथच्या उपसरपंच सौ. प्राची माणगावकर, युवक पदाधिकारी सौ. पल्लवी खानोलकर, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, बाळा गोलतकर, नेहा शंकरदास, तालुका महिला सदस्या नीलम करंगुटकर, सौ. वर्षा केरीपाळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page