मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न…

देवगड (प्रतिनिधी) ३० जुलै २०२४-:देवगड तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका वकिल संघटना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन मिठमुंबरी सरपंच श्री . बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
याप्रसंगी मार्गदर्शन शिबिरात विधिज्ञा श्रीम .एस.एस. कालेकर यांनी बालकांचे संरक्षण व कायदा , अर्धवट शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत समाविष्ट करून घेण्याबाबत त्या तरतुदीची माहिती तसेच कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ बाबत मार्गदर्शन केले . तसेच विधिज्ञा श्रीम .एम.एम. खोबरेकर यांनी बेटी बचाओ , बेटी पढाओ याबाबत मार्गदर्शन केले तर पाणी व स्वच्छता समन्वयक विनायक धुरी याने शासकीय योजनेंबाबत मार्गदर्शन केले .
या मार्गदर्शन शिबीराला प्रमुख मान्यवर ग्रामसेविका श्रीम .आर .एस. गोवळकर मॅडम,श्री एस.आर. जाधव , मुख्याध्यापक श्री .मधुसुदन घोडेसर, शाळा समिती अध्यक्ष श्री .हेमंत तोंडणकर , शिक्षक श्री .सचिन धुरी , शिक्षक श्री . सुरेश साळुंखे , माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री .सत्यवान गांवकर , ग्रा.प सदस्य श्रीम .मिनल मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी शाळेचे विदयार्थी , ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व बचतगटातील महिला, मोठया संख्येने उपस्थित होते .
या कायदेविषयक शिबीराबाबत सरपंच बाळकृष्ण गांवकर यांनी कौंतुक करत अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबीर मिठमुंबरी गावात केल्याबद्दल तालुका विधी सेवा समिती देवगड,तालुका वकिल संघटना देवगड यांचे तसेच या मार्गदर्शन शिबीराचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक मधुसुदन घोडे ,या सर्वांचे आभार सरपंच बाळकृष्ण गांवकर यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page