प्रभाकर सावंत: खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा होणार नागरिक सत्कार…
⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तीन रोजी बॅरिस्टर नाथ.पै हॉलमध्ये भाजपचा विस्तार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे दिली.
दरम्यान या अधिवेशनाला एक हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तसेच महाराष्ट्रातून प्रदेशचा एक नेता उपस्थित राहणार असून तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विक्रांत पाटील, निलेश राणे, नितेश राणे, आदी प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत.यावेळी लोकसभेत विजयी उमेदवार श्री नारायण राणे व कोकणचे यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री सावंत यांनी यावेळी दिली. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सुधीर दळवी, सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसरं पर्व सुरू झाले आहे. विरोधकांचे दावे फोल करत देशात पुन्हा भाजपची सत्ता आली. याच पार्श्वभूमीवर काही राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राकडून अधिक अपेक्षा आहे. लोकसभेला कमी यश आम्हाला मिळाल. त्याची भरपाई आम्ही विधानसभेत करण्यासाठी तयारी केली आहे असं मत प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले.
तर १९ जुलैला पुणे येथे पक्षाच अधिवेशन झाले. त्यावेळी नेतेमंडळीन संबोधित केलं. निवडणूकीची व्युहरचना ठरवण्यात आली. प्रत्येक तालुक्यात असं अधिवेशन भरवाव अशी संकल्पना यावेळी ठरली. कोकण आणि सिंधुदुर्गात आम्हाला भरघोस यश मिळाले. हाच उत्साह व उर्जा मोठ्या मताधिक्यात परिवर्तीत करण्यासाठी हे अधिवेशन होणार आहे. तर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणेंचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कोकणचे नेतृत्व करणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचाही सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सावंत यांनी दिली.
