राजू बेग:विशाल परब यांच्यातर्फे सावंतवाडी शहर शाळा नं.४ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
⚡सावंतवाडी ता.३०-: आजचे शाळकरी विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गात मदत व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब हे अनेक शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विशाल परब राबवत असलेला हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून भारतीय जनता पार्टीचे सेवाभावी काम यामधून तळागाळात पोहोचत आहे असे गौरवोद्गार सावंतवाडी शहराचे माजी उपनगराध्यक्ष श्री. राजू बेग यांनी काढले आहेत. सावंतवाडी शहर शाळा नंबर चार मध्ये झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्यासह माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक गुरू मठकर, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, शहर मंडल उपाध्यक्ष दिलीप भालेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, बुथ अध्यक्ष ज्ञानेश पाटकर, केतन आजगांवकर, श्रीमती अन्वया विरनोडकर, गणेश पडते, मुख्याध्यापक ध्रुवसिंह पावरा आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने यावेळी भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीतर्फे या शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अनेक शाळांमध्ये संपन्न झाला आहे आज सावंतवाडी मध्ये शाळा नंबर ४ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी
